फुलांची काढणी ः
फुलांची काढणी ः
१) लागवडीनंतर तीन ते चार महिन्यांनी फुले काढणीस योग्य होतात. पूर्ण
वाढ झालेल्या कळ्या आणि उमललेल्या फुलांची काढणी नेहमी सकाळी पाच ते आठ किंवा
संध्याकाळी सहा ते सात वाजता करावी.
२) फुलदाणीत किंवा पुष्पगुच्छ यासाठी सर्वांत खालची दोन-तीन फुले
असतात. उमलत असलेले फुलदांडे जमिनीलगत पानाच्या वरील बाजूस छाटावेत. अशा अशा
छाटलेल्या फुलदांड्यांच्या एक डझनच्या जोड्या बांधून वर्तमानपत्राच्या कागदात
गुंडाळून बांबू किंवा कागदामध्ये भरून लांबच्या बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवावी.
३) साधारण हेक्टरी ८ ते १० लाख फुले मिळतात, तर सुक्या फुलांचे
उत्पादन हेक्टरी सात ते आठ टन मिळते. सुट्ट्या फुलांना भारतीय
बाजारपेठेत भरपूर व नियमित मागणी असल्यामुळे अशी फुले बाजारपेठेत ५ ते ७ किलो
क्षमतेच्या बांबू किंवा कागदाच्या बॉक्समध्ये भरून बाजारपेठेत विक्रीस पाठवावीत.
सुट्या फुलांपासून गुलछडी अर्क हे सुगंधी द्रव्य ०.०८ ते ०.११ टक्का काढता येते.
यास परदेशातून चांगली मागणी आहे.

Comments
Post a Comment