निशिगंधाची तथा गुलछडी लागवड कशी करावी?
निशिगंधाची तथा गुलछडी लागवड कशी करावी ? कोरड्या हवामानात जेथे पाण्याची बारमाही सोय आहे , तेथे याची लागवड फायदेशीर ठरते. निशिगंधाची ( Tuberose) फुले पांढरीशुभ्र असून सुवासिक असल्याने फुले वेणी , गजरा , पुष्पहार , फुलांच्या माळा किंवा फुलदांडे , फुलदाणी व पुष्पगुच्छ करण्यासाठी वापरले जातात. निशिगंध फुलांपासून ०.०८ ते ०.११ टक्का सुगंधी द्रव्य मिळते. निशिगंध पिकास उष्ण आणि दमट हवामान चांगले मानवते. कोरड्या हवामानात जेथे पाण्याची बारमाही सोय आहे , तेथे याची लागवड फायदेशीर ठरते. अति थंड हवामान व अति पाऊस या पिकास हानिकारक आहे. ) पाण्याचा उत्तम निचरा होणारी हलकी ते मध्यम जमीन चांगली मानवते. जमिनीचा सामू साधारणपणे ६.५ ते ८ च्या दरम्यान असावा. हलक्या जमिनीत भरपूर प्रमाणात सेंद्रिय खताचा वापर करावा किंवा लागवडीपूर्वी हिरवळीच्या पिकांची पेरणी करून ते जमिनीत कुजण्यासाठी गाडावे. २) हे पीक बहुवर्षीय असून एकदा लागवड केल्यास त्या जमिनीत सतत तीन वर्षे ठेवता येते किंवा प्रत्येक वर्षी नवीन लागवड केली जाते.लागवडीसाठी २० ते ३० ग्रॅम किंवा त्याहून अधिक वजनाचे कंद वापरावेत. ह...