माळरानावर गुलछडीचा सुगंध
माळरानावर गुलछडीचा सुगंध
सोनवडी सुपे (ता. बारामती, जि. पुणे) येथील कुंडलिक मोरे यांच्याकडे वडिलोपार्जित सोळा एकर शेती आहे. त्यापैकी पाच एकर क्षेत्र पठारी व माळरान असल्याने ती पडीक होती. सन 2007 ला त्यांनी त्या जमिनीची मशागत करून घेतली. तिथे सिंचनासाठी विहीर खोदली. विहिरीला पाणीही चांगले लागले. त्यांची प्रकाश व मिनिनाथ ही दोन मुले आपापला व्यवसाय सांभाळून शेतीकडेही लक्ष देतात. मुलांच्या मदतीने मोरे यांनी रेशीम शेती सुरू केली. त्याचे व्यवस्थापन चांगल्या रीतीने केल्याने त्यांना बऱ्यापैकी फायदा मिळत आहे. तसेच या क्षेत्रापैकी दीड एकर क्षेत्रावर लिंबाची बाग लावली आहे. इतर क्षेत्रामध्ये कोरडवाहू पद्धतीने पावसावर आधारित ज्वारी, बाजरी, गहू आदी हंगामी पिके ते घेतात. विहिरीचे पाणी उन्हाळ्यात कमी पडत असल्याने त्यांनी शेतात 350 फूट बोअर घेतले. बोअर व विहिरीच्या पाण्यावर पिकांचे नियोजन केले.
लागवडीत सुधारणा...
- गुलछडी
गेल्या दहा वर्षांपासून करत असल्याने त्यातील प्रत्येक अडचणीवर उपाय
शोधण्याचा प्रयत्न केला आहे.
- या आधी
गादीवाफ्यावर तीन ते चार ओळी लावल्या जात असत. त्यात आता बदल केला आहे.
गुलछडी कंदाची एक ओळ सरीवर लावली जात असून, दोन
सरींतील अंतर दोन फूट ठेवले जाते. दोन कंदांतील अंतर हे 10 इंच ते एक फूट ठेवले जाते. कमी वेळ चालवूनही
ठिबकचे पाणी योग्य प्रमाणात प्रत्येक रोपांपर्यंत पोचते. त्यामुळे अधिक
पाण्यामुळे होणाऱ्या मर समस्येचे प्रमाण कमी होते. तोडणीचे कामही सुलभ होते.
- शेणखत
व सेंद्रिय खतांचे प्रमाण अधिक ठेवल्याने रोपांचे आरोग्य चांगले राहते. आता
त्यांची उंची चार फुटांपर्यंत झाली आहे. फुले तोडणीचे काम न वाकता अगदी
सहजपणे करता येते.
- फुले
काढणीसाठी गळ्यामध्ये अडकविण्याच्या पिशव्या तयार करून घेतल्या आहेत.
त्यामुळे दोन्ही हात रिकामे राहतात. दोन्ही हातांनी फुले तोडणी केली जात
असल्याने फुलांचा गोंडा मोडत नाही. नुकसान टळते.
मोरे यांच्याकडे जर्सी गाई व खिलारी बैल आहेत. दुभत्या जनावरांपासून दुधाबरोबर
शेणखत मिळते. शेणखत शेतीला दिले जाते. त्यामुळे रासायनिक खतांवरील खर्च कमी झाला
आहे.
दर सहा
महिन्याला गुलछडीला 10:26:26
व युरिया खत
दिले जाते. त्यासाठी प्रति वर्ष चार हजार 600 रुपयांपर्यंत खर्च होतो. गरजेनुसार कीड व रोगांच्या नियंत्रणासाठी फवारणी
घेतली जाते.
परिसरात अनेक शेतकऱ्यांनी पाण्याच्या नियोजनानुसार गुलछडी शेती केली आहे.
सर्वांची फुले पुणे येथील फुलबाजारात पाठविण्यासाठी टेंपोची व्यवस्था आहे. दररोज
सकाळी साडेसात वाजता फुलांचा टेंपो पुण्याला जातो. फुलांचे पैसे दर आठवड्याला
मिळतात. त्यामुळे अनेकांचे आठवडा बाजाराचे नियोजन फुलांच्या पैशावर होते. मात्र
यंदा दुष्काळातील पाणीटंचाईमुळे अनेकांची गुलछडी जळून गेली आहे.

Comments
Post a Comment